Skip to main content

Posts

Featured

हाक

करमत नाही ग आई मला, सांग कसे ग सांगु मी तुला.? खूप एकटे एकटे वाटते मला हे कळेना कुणालाच... तु गेलीस मला सोडून,नि वाटे सगळेच पराये झाले मला, आपल्याच घरातल्या सगळ्यांन मधे शोधावे लागते तुला, तु भेटशील कुणाच्या तरी रुपात मला, पण तुझी सावली ही, कुठेच दिसेना मला, बाबा आहेत ग आपले म्हणायला, ताई ही येतात मला भेटायला, वहिनी ही आली तुझी जागा घ्यायला, पण ते सर्व असुन ही,तुझीच कमी खलते मला; तु हवी होतीस,असेच वाटते मला; का कुणास ठाऊक,पण तुझीच उणीव भासते मनाला; येशील ना ग आई, परत एकदा मला भेटायला..?                                    

Latest Posts

सासर

Wah re mard jaati

Mn ki aawaj